महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय रचना :

महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातील एक प्रगत राज्य आहे.

सध्या महाराष्ट्रात ३६ जिल्हे आहेत.

हे जिल्हे ६ प्रशासकीय विभागांमध्ये विभागले आहेत:

–  कोकण विभाग

–  पुणे विभाग

–  नाशिक विभाग

–  छत्रपती संभाजीनगर विभाग

–  अमरावती विभाग

–  नागपूर विभाग

प्रमुख भौगोलिक भाग :

महाराष्ट्राचे ५ प्रमुख भौगोलिक प्रदेश आहेत:

  1.  विदर्भ – नागपूर व अमरावती विभाग

  2. मराठवाडा – छत्रपती संभाजीनगर विभाग

  3. खान्देश व उत्तर महाराष्ट्र – नाशिक विभाग

  4. कोकण – कोकण विभाग

  5. पश्चिम महाराष्ट्र – पुणे विभाग

विशेष माहिती :

  • अहिल्यानगर जिल्हा हा क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा आहे.

  • मुंबई शहर जिल्हा हा सर्वात लहान आहे.

  • मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे १००% शहरी जिल्हे असून, त्यांना जिल्हा परिषद नाही.

  • त्यामुळे महाराष्ट्रात ३६ जिल्हे असूनही फक्त ३४ जिल्हा परिषद आहेत.

विभागनिहाय जिल्हे :

 १. कोकण विभाग (मुख्यालय: मुंबई)

जिल्हे : मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

२. पुणे विभाग (मुख्यालय: पुणे)

जिल्हे : पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर

३. नाशिक विभाग (मुख्यालय: नाशिक)

जिल्हे : नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर

४. छत्रपती संभाजीनगर विभाग (मुख्यालय: छत्रपती संभाजीनगर)

जिल्हे : छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी

५. अमरावती विभाग (मुख्यालय: अमरावती)

जिल्हे : अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा

६. नागपूर विभाग (मुख्यालय: नागपूर)

जिल्हे : नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली