माझी ग्रामपंचायत काय आहे ?

गाव बदलला की देश बदलतो !
एकलव्य फाऊंडेशनच्या माध्यमातून आम्ही शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि महिला सक्षमीकरण या मूलभूत क्षेत्रांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात सक्रियपणे कार्यरत आहोत. मात्र, कोणत्याही देशाची खरी प्रगती ही शहरांमधून नव्हे, तर गावांच्या सशक्त उभारणीमधून घडते. आपल्या गावांचा आणि ग्रामपंचायतींचा विकास म्हणजेच एक संपन्न भारत घडविण्याचे पाऊल!
हीच भावना लक्षात घेऊन एकलव्य फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रविण महादू देशमुख यांनी “माझी ग्रामपंचायत” ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. या उपक्रमाचे उद्दिष्ट केवळ गावांच्या विकासावर प्रकाश टाकणे हे नसून, ग्रामपंचायतींनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचे दस्तऐवजीकरण करून ते सर्वांसमोर मांडणे हेही आहे.
या उपक्रमाद्वारे आम्ही शासनाच्या योजनांचा प्रभाव, ग्रामपंचायतींची दूरदृष्टी, स्थानिक नेतृत्व, लोकसहभाग, आणि इतर यशोगाथा एका व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. “माझी ग्रामपंचायत” हा केवळ माहितीपर उपक्रम नाही, तर तो ग्रामीण भागाच्या उज्ज्वल भविष्याचा दस्तऐवज आहे.
गावागावांमधील प्रेरणादायी बदल, नवसंकल्पना आणि लोकसहभागाच्या जोरावर साकारलेली ही कहाणी. ही आपल्या देशाच्या नवभारताच्या दिशेने चाललेली एक महत्त्वपूर्ण पावले आहेत.

आदर्श ग्रामपंचायत कशी असावी ?

डिजिटल शाळा

प्रत्येक गावातील शाळा डिजिटल स्वरूपात विकसित केली जावी.

स्मार्ट बोर्ड, ई-लर्निंग सुविधा, इंटरनेट आणि ऑनलाइन क्षणचित्रांचा वापर व्हावा.

विद्यार्थ्यांसाठी टॅब्लेट किंवा संगणकांची सोय केली जावी.

शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी डिजिटल साक्षरतेसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जावेत.

शुद्ध पाणी आणि स्वच्छता

शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आरओ प्लांट किंवा पाणी फिल्टर यंत्रणा बसवावी.

पाणी साठवण व वितरणाची योग्य आणि सुरक्षित व्यवस्था असावी.

पावसाचे पाणी साठवण्यासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवावे.

शेतकऱ्यांसाठी ठिबक सिंचन, जलसंवर्धन व पाणी बचतीवर भर द्यावा.

आधुनिक शेती

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शाश्वत आणि उत्पादनक्षम शेती करावी.

ड्रोन, सेन्सर्स आणि डेटा अ‍ॅनालिटिक्सच्या मदतीने शेती व्यवस्थापन करावे.

शेतकऱ्यांना मोबाईल अ‍ॅपद्वारे हवामान अंदाज, बाजारभाव आणि तज्ज्ञांचा सल्ला मिळावा.

ई-मार्केटिंग व ई-कॉमर्सच्या माध्यमातून शेतमालाला चांगला बाजारभाव मिळवून द्यावा.

शासकीय योजनांमधून उभ्या राहिलेल्या सुविधा

ग्रामपंचायत भवन

प्राथमिक आरोग्य केंद्र

शैक्षणिक संस्था

सामुदायिक सभागृह

कृषी सेवा केंद्र